ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेबसीरिज यांमध्ये अनेक अभिनेत्रींनी काम करून आपले नशीब आजमवले आहे. त्यांनी एकापेक्षा एक बोल्ड सीन्स देऊन प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्याचकारणामुळे प्रेक्षकांनी देखील त्यांना पसंती देत लोकप्रियता मिळवून देण्यात यश दिले. वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळे बोल्ड सीन्स देऊन या अभिनेत्रींना केवळ लोकप्रियता मिळाली असे नाही, त्यांना यामुळे आपल्या करिअरला पुढे नेण्याची संधी देखील मिळाली. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटली की, या यादीत ‘शेरशाह’ आणि ‘कबीर सिंग’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री कियारा आडवाणीचाही समावेश आहे. चला तर मग या सर्व अभिनेत्रीची नावे जाणून घेऊया ज्यांनी जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन आपले नशीब आजमवले.
त्रिधा चौधरी
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध वेब सीरिज ‘आश्रम’ फेम अभिनेत्री त्रिधा चौधरीनेही एकापेक्षा एक बोल्ड सीन्स दिले आहेत. जे त्यावेळी खूप चर्चेत होते. त्यानंतर ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. आजही या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर चाहते खूप प्रेमाचा वर्षाव करतात.
कियारा आडवाणी
कियारा आडवाणी ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ मधील तिच्या अप्रतिम अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. याआधी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटातही ती दिसली होती. ज्यामध्ये तिने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले होते. ज्याची प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.
रसिका दुग्गल
अभिनेत्री रसिका दुग्गलने प्रसिद्ध वेब सीरिज ‘मिर्झापूर’मध्ये आपल्या बोल्ड अभिनयाची जादू दाखवली. यातील तिची अदा पाहून प्रेक्षक घायाळ झाले. या सीरिजमध्ये तिने पंकज त्रिपाठी आणि कुलभूषण खरबंदा यांच्यासोबत बोल्ड सीन्स चित्रित केले होते.
कुब्रा सैत
कुब्रा सैतने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये अप्रतिम काम केले आहे. ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते, जे पाहून प्रेक्षक दंग झाले होते. तिने चित्रित केलेल्या बोल्ड सीनची खूप चर्चा झाली, जी प्रेक्षकांना खूप आवडली.
अदिती पोहनकर
‘शी’ या वेबसिरीजमध्ये खूप बोल्ड सीन्स देणारी अदिती पोहनकर होय. याशिवाय आदिती ‘आश्रम’मध्येही दिसली आहे. पण ‘शी’मधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली. प्रेक्षकांनी अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.
हेही वाचा :