बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटची चर्चा अद्याप सिने जगतात सुरूच आहे. गेल्या महिन्यांत अभिनेता रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोशूटवर अनेकांनी जोरदार टिका केली होती. त्यानंतर रणवीर सिंगच्या या फोटोशूटविरुद्ध रणवीर सिंग विरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर आता रणवीर सिंगबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, चित्रपट अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये रणवीर सिंग न्यूड दिसला, जो काही लोकांना अजिबात आवडला नाही आणि काही ठिकाणी रणवीरवर एफआयआर दाखल करण्यात आला. अलीकडेच मुंबई पोलिसांनी रणवीर सिंगला समन्स पाठवून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. रणवीर सिंग काल म्हणजेच २० ऑगस्टला पोलिस ठाण्यात पोहोचला नव्हता.
आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आक्षेपार्ह फोटोशूट प्रकरणात चेंबूर पोलिस स्टेशनने रणवीर सिंगला समन्स बजावले होते आणि त्याला उद्या म्हणजेच सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, रणवीर सिंगने हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आता या प्रकरणी तारीख निश्चित केल्यानंतर नव्याने समन्स पाठवले जाणार आहे.
हेही वाचा – राजूच्या तब्येतीविषयी त्याच्या कुटुंबाकडून महत्त्वाची माहिती, ‘या’ अभिनेत्याने ट्वीट करत दिली अपडेट
ऋषी कपूर यांच्या हट्टामुळे ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता नकार, नीतू कपूर यांनी केला खुलासा
बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण