Friday, April 19, 2024

राजूच्या तब्येतीविषयी त्याच्या कुटुंबाकडून महत्त्वाची माहिती, ‘या’ अभिनेत्याने ट्वीट करत दिली अपडेट

मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव याच्या तब्येतीविषयी कुटुंबीय आणि मित्रांना चिंता सतावतेय. हृदयविकाराच्या झटक्याने तो रुग्णालयात दाखल आहे. मागील ११ दिवसांपासून त्याच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याला शुद्ध आली नाहीये. अशात प्रत्येकजण त्याच्या आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. राजू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्याबद्दल खोट्या बातम्याही पसरवल्या जात होत्या. त्यामुळे, त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र त्याच्या तब्येतीबद्दल माहिती देत आहेत.

अशातच अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) याने रविवारी (दि. २१ ऑगस्ट) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने राजू श्रीवास्तव याच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. त्याने ट्विटरवरून ट्वीट करत लिहिले की, “राजूच्या कुटुंबाकडून मिळालेली त्याच्याविषयी ताजी माहिती… त्याच्या शरीरातील अवयव आता सामान्यरीत्या काम करू लागले आहेत. मात्र, तो अजूनही बेशुद्ध आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. महादेवाची कृपा. हरहर महादेव.”

यापूर्वी राजूचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, कॉमेडियन रुग्णालयात डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली आहे. त्याने लोकांना अफवांवर लक्ष न देण्याची विनंती केली आहे. तसेच, त्याने आवाहन केले आहे की, त्याच्या भावासाठी प्रार्थना करा. तो म्हणाला होता की, “तो एक शूरवीर आहे आणि लवकरच लढाई जिंकून परतेल. तो त्याच्या कॉमेडीने पुन्हा सर्वांचे मनोरंजन करेल.”

दुसरीकडे, राजूचा मॅनेजर याने माध्यमांशी चर्चा केली होती. यावेळी त्याने सांगितले होते की, त्याच्या डोक्याची सूज आता कमी झाली आहे. तसेच, हे स्पष्ट केले होते की, त्याचा मेंदू ठीक आहे. मात्र, तो अद्याप कोमाच्या स्थितीत आहे.

राजू हा १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते की, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण
‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला
‘ओव्हर ऍक्टिंगच दुकान’, पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ पाहून पूनम पांडे झाली ट्रोल

हे देखील वाचा