ईशान खट्टर, मृणाल ठाकूर आणि प्रियांशु पेंयुली अभिनित वॉर फिल्म ‘पिप्पा’ बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्स कोरोनाच्या या दुसर्या लाटेत कोणताही धोका पत्करु इच्छित नव्हते. आता अशा परिस्थितीत ‘पिप्पा’ संबंधित ताजी बातमी समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, इशान, मृणाल आणि प्रियांशु यांच्या या चित्रपटाची शूटिंग यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होऊ शकते.
चित्रपटाचे कलाकार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत रीडिंग सेशनला सुरुवात करतील. या चित्रपटासाठी कलाकारांना एकमेकांना चांगले ओळखणे फार महत्वाचे आहे, तसेच चित्रपटाच्या कथेशी स्वत: ला परिचित करून घेणे देखील महत्वाचे आहे. हा एक वॉर चित्रपट आहे, त्यामुळे ऑगस्टपासून युद्ध आणि ऍक्शन सीक्वेन्ससाठी कलाकार प्रशिक्षणही घेतील. (pippa ishaan khatter mrunal thakur priyanshu painyulis begin shoot september)
‘पिप्पा’ हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असेल. तथापि, चित्रपटाचा फोकस ‘बॅटल ऑफ गरीबपूर’वर असेल, ज्याच्या उल्लेख ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांनी ‘द बर्निंग चैफिस’ या पुस्तकात केला होता. या चित्रपटात ईशान खट्टर ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शिन राजा कृष्ण मेनन यांनी केलं आहे. ‘पिप्पा’च्या कथेचे लेखन रविंदर रंधावा, तन्मय मोहन आणि राजा कृष्णा मेनन यांनी मिळून केले आहे. RSVP आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित ‘पिप्पा’ पुढच्या वर्षाच्या शेवटी सिनेमागृहात दाखल होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट










