कलाक्षेत्रातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कवयित्री आणि उत्कृष्ट चित्रकार माधुरी गयावळ (Madhuri Gayawal) यांचे गुरूवारी (२८ जुलै) निधन झाले आहे. मृत्यूवेळी त्या ५८ वर्षांच्या होत्या. खरं तर, एका काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करतानाच त्यांना मृत्यूने गाठले.
माधुरी गयावळ या ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या ‘मल्हार धून’ या ऑनलाइन कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करत होत्या. यावेळी त्यांनी काही कवयित्रींना कविता वाचायला बोलावले. त्याआधी इतर कवींच्या कवितांच्या चार-चार ओळीही त्यांनी सादर केल्या. मात्र पुढच्या कवयित्रीला बोलावत असताना, अचानक त्यांना खोकला आला.
या ऑनलाइन संमेलनाच्या संयोजिका ज्योत्स्ना चांदगुडे आणि त्यांच्या सहकारी कवयित्रींनी माधुरी गयावळ यांना पाणी पिऊन येण्यास सांगितले. त्या पाणी प्यायला गेल्या, पण परत आल्याच नाहीत. चिंतेत असलेल्या त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या घरी कॉल केला. तेव्हा माधुरी गयावळ यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली. हैराण करणारी बाब म्हणजे, यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाचे माहिती समोर आली.
माधुरी गयावळ या ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या सचिव होत्या. तसेच त्या साहित्यदीप प्रतिष्ठानशी निगडित होत्या. त्यांचा ‘मनांगण’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात्त पती, मुलगा, सून व नात असा परिवार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा










