Wednesday, June 26, 2024

राज ठाकरेंनी केले अशोक मामांचे कौतुक! म्हणाले, ‘त्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून…’

महाराष्ट्र नव निर्माण सेना ( मनसे) पक्षाचे आध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणात माराठी माणसाच्या आवाजासाठी बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. ते आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. मात्र, यावेळेस राज ठकरे आपल्या वक्तव्यामुळे नाही तर मनोरंजन क्षेत्रामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हळुहळु राज साहेब मनोरंजन क्षेत्रामध्ये सक्रिय होत असताना दिसून येत आहेत.

प्रसिद्ध राजकारणी (मनसे) पक्षाचे आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या आपल्या वेगळ्याच कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतंच ‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये आपला आवाज दिला आहे, ज्यामुळे त्यांनी मनोरंज क्षेत्रामध्ये आपली आवड दाखवली आहे. त्यांनी व्हाईस ओवर करत असताना त्यांना काही गोष्टीचा अनुभव सांगितला की, “चित्रपटात कष्ट घेणं महत्वाचं आहे. भलेही तो चित्रपट पडला तरी चालेल, पण त्यामध्ये कष्ट घेणं गरजेचं आहे.” ते नेहमी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक करत असतात.

ashok saraf

राज ठाकरे यांना चित्रपट आणि नाटक पाहायला फार आवडते. त्यांनी नुकतंच मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज कलाकार अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे ‘व्हॅक्युम क्लिनर’ हो नाटक पाहिले. त्यांना हे नाटक खूपच आवडले आणि नाटकाचे कौतुक करत त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यंनी नाटकाप्रती आपल्या भावणा व्यक्त केल्या.

साहेबांनी पोस्ट सेअर करत पूर्ण टिमचे कौतुक केले आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगत काही पूर्ण टीम आणि अशोक सराफांसोबतचे काही फोटो देखिल शेअर केले आहेत. राज ठाकरेंनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ आणि निर्मित सावंत यांचा व्हॅक्युम क्लीनरचा पहिला भाग मंगळवार (दि. 25 ऑक्टोंबर) दिवशी गडकरी रंगयतन ठाणे या ठिकाणी झाला. पुर्ण आठवड्यात नाटकाचे 4 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यामधये साध्या कॉमेडीने प्रेक्षकांना मोलाचा संदेश देण्यात आला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 3 वर्षानंतर प्रियंकाचे भारतामध्ये आगमन, आल्याबरोबर व्यक्ती केली भावनिक पोस्ट
भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

हे देखील वाचा