Wednesday, July 3, 2024

‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. अशात आता शरद पवार यांची लेक आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पठाण या चित्रपटाबाबत एक माेठे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही नेत्यांवरही निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी पठाण यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावर निशाणा साधला आहे.

शाहरुख खान (shah rukh khan) आणि दीपिका पदुकोण चित्रपटात छान दिसत असल्याचा दावा सुप्रिया यांनी केला आहे. अनेकांना शाहरुख खानचा हेवा वाटतो, असेही त्या म्हणाला. विशेष म्हणजे डिसेंबर 2022मध्ये पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा दिला होता. याचे कारण म्हणजे दीपिका पदुकोणने या गाण्यात ऑरेंज रंगाची बिकीनी घातली हाेती, ज्याबद्दल अनेकांनी भावना दुखावल्याचे सांगितले.

एका मुलाखतीत सुप्रिया सुळे (supriya sule) यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, “मी शाहरुख खानला कसे ओळखणार? तो भारताचा सुपरस्टार आहे. पठाणमध्ये तो खूप छान दिसत आहे. दीपिका आणि त्याची जोडी छान दिसतेय. मला वाटतं अनेकांना शाहरुख खानचा हेवा वाटतो.”

एक राजकारणी म्हणून नरोत्तम मिश्रा यांच्यासारख्या नेत्यांच्या विधानाचे समर्थन करता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “नाही, मी त्यांचा बचाव करणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पठाण चित्रपटा विषयी बाेलायचे झाले, तर या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त जॉन अब्राहमचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.(politician sharad pawar daughter supriya sule claims people are jealous of shah rukh khan see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वाटतंय की हा देश आता वेड्यांच्या…’, पठाण चित्रपटाची वाढती गर्दी पाहून माजी न्यायधीश संतापले

हंसती हंसती रहे तु हस्ती रहे, हया की लाली खिलती रहे…!

हे देखील वाचा