बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीाच चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसांनी ‘पोनीं सेल्वन पार्ट-1’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामुळेच चित्रपटाची संपूर्ण कास्ट जोरात प्रमोशन करत आहे. अलीकडेच या चित्रपटाची अभिनेत्री ऐश्वर्या विमानतळावर दिसली. यादरम्यान त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या सैल कपड्यांमध्ये दिसली होती, ज्यामुळे यूजर्स तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावू लागले आहेत. एअरपोर्टवर ऐश्वर्या लाँग जॅकेट आणि ब्लॅक लेगिंग्जमध्ये दिसली.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ती प्रेग्रेंट असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. ऐश्वर्या नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिने सैल कपडे घातले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी हा अंदाज लावला आहे. आता या क्लिपवर लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
एका यूजरने लिहिले की, ‘ती पुन्हा आई होणार आहे.’ आणखी एका यूजरने ‘बच्चन कुटुंबातील दुसरे अपत्य येणार आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी ‘ती प्रेग्नंट आहे असे दिसते आहे, ती लवकरच गुड न्यूज देणार आहे.’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘पीएस-१’ या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा- बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा
Death Anniversary : कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम
‘क्लासिक गाण्याची वाट लावू नको’ म्हणणाऱ्या फाल्गुनी पाठकला नेहा कक्करने दिले सडेतोड उत्तर