Saturday, April 20, 2024

‘क्लासिक गाण्याची वाट लावू नको’ म्हणणाऱ्या फाल्गुनी पाठकला नेहा कक्करने दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिकामधील एक नेहा कक्कर आहे. तिच्या गाण्यांनी तर तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. पण सध्या सोशल मीडियावर नेहा कक्करला ट्रोल करत आहे. ही टीका नेहाने 90च्या दशकातील गायिका फाल्गुनी पाठकचे अतिशय हिट गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चे रिमेक व्हर्जन केल्यामुळे रंगल्या आहेत. हे गाणे ऐकून फाल्गुनीने नेहाला सुनावले होते. आता नेहाने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

नेहाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘मी आयुष्यात जे कमावले आहे ते देशातील फार कमी लोकांच्या नशीबात असेल. इतक्या कमी वयात लोकप्रियता, इतकी हिट गाणी, सुपरडुपर हिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून 80-90 वर्षांपर्यंतचे चाहते आणि बरेच काही. तुम्हाला माहिती आहे का मला हे सर्व कसे मिळाले आहे. कठीण काम, टॅलेंट, कामाची ओढ, सकारात्मक विचार या सर्व गोष्टींच्या आधारावर मला हे सर्व मिळाले आहे. मला देवाने आजपर्यंत जे काही दिले आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते. मी देवाची लाडकी आहे आणि त्यासाठी खरच मनापासून आभार’ या आशयाची पोस्ट नेहाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

काय म्हणाल्या होत्या फाल्गुनी पाठक?
फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. हा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी, ‘नेहा कक्कर तू आणखी किती खालच्या पातळीला उतरणार आहे? ‘आमच्या जुन्या क्लासिक गाण्यांची वाट लावणे बंद कर’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

 

View this post on Instagram

 

‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणे फाल्गुनी पाठक यांनी गायिले होते. आता या गाण्याचा रिमेक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 19 सप्टेंबर रोजी नेहाने ‘ओ सजना’ हे गाणे प्रदर्शित केले. या गाण्यात नेहासोबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागचीने म्यूझिक दिले आहे. पण हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत नसल्याचे दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

रुपाची खान, दिसती छान! अरबाजची गर्लफ्रेंड आहे खूपच संंदर अन् ग्लॅमरस; अशी केली बॉलिवूड एन्ट्री
‘बिग बॉस’ने बदललं सृष्टीचं आयुष्य, झालेला साखरपुडा मोडून आता बनलीय कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड

हे देखील वाचा