Wednesday, June 25, 2025
Home साऊथ सिनेमा Ponniyin Selvan | चित्रपटाचा दमदार टीझर रिलीझ, पाहून लक्षात येतील ‘बाहुबली’चे ‘ते’ सीन

Ponniyin Selvan | चित्रपटाचा दमदार टीझर रिलीझ, पाहून लक्षात येतील ‘बाहुबली’चे ‘ते’ सीन

दक्षिण इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ पार्ट १ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीझ झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’च्या या लेटेस्ट टीझरमध्ये, तुम्हाला दक्षिण अभिनेता विक्रम (Vikram), कार्ती (Karthi) आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या पात्रांची झलक पाहायला मिळेल. 

धमाकेदार आहे ‘पोन्नियिन सेल्वन’चा टीझर
‘पोन्नियिन सेल्वन १’चा हा टीझर अलीकडेच बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवर शेअर केला आहे. ‘पोन्नियिन सेल्वन १’चा हा टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ‘बाहुबली’ हा सुपरहिट चित्रपट नक्कीच आठवेल. कारण ‘पोन्नियिन सेल्वन’च्या टीझरमध्ये काही सीन्स आहेत, जे साऊथचा सुपरस्टार प्रभास बाहुबलीसोबत जुळतात. मात्र, या चित्रपटाची कथा चोल शासकांभोवती फिरत असल्याचे दिसते. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवे विक्रम करेल, याचा अंदाज टीझरवरून सहज लावता येतो.

‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट
‘पोन्नियिन सेल्वन’चा हा टीझर पाहिल्यानंतर सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पोनियिन सेल्वन’च्या धमाकेदार टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मणिरत्नम यांच्या ड्रामा पीरियड चित्रपटात अभिनेता विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम राम आणि त्रिशा कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन’च्या टीझरमध्ये ही सर्व पात्रे भव्य पद्धतीने मांडण्यात आली आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा