टेलिव्हीजनचा काॅन्ट्रावर्शीअल शो बिग बाॅस 17 अंतिम टप्यात पोहोचला आमुनावर फारुकीहे. बिगबाॅस 17 ला त्याचे अंतिम 5 कंटेस्टंट मिळाले आहेत. ज्यात अंकिता लोखंडे(Ankita Lokhande), मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार और अरुण महाशेट्टी यांचा समावेश आहे. आता यातला विनर कोण होणार हे पाहण्यासाठी सर्वचजण आतुर आहेत. उद्या 28 जानेवारीला या शोचा ग्रँड फिनाले(Grand Finale) पार पडणार असुन. हा ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे या शो च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड फिनाले 6 तास चालणार आहे.

बिग बाॅस 17 अंतिम टप्यात आहे. शेवटी बिगबाॅस 17(BigBoss 17)ला उद्या विनर भेटणार आहे.या शोच्या टाॅप 5 मध्ये पोहोचलेल्या मुनावर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आतापर्यंत खुप बोलणं आणि काही वादही झाले. त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान(Ayesha Khan) शोमध्ये आल्यापासुन तर त्याला खुप ट्रोलही केलं गेलं. परंतू घराच्या पुर्णपणे विरोधी चित्र बाहेर दिसत आहे. घराबाहेर मात्र मुनावर फारुकीला चाहत्यांचा खुप सपोर्ट भेटत आहे.

मन्नाराला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली पुजा भट्ट
मुनावरला(Munawar Faruqui) फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही सपोर्ट करताना दिसले. आता त्या लिस्टमध्ये अजुन एका सेलिब्रिटीचं नाव आले आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसुन पुजा भट्ट आहे. पुजा बिगबाॅस 2 मध्ये कंटेस्टंट होती. त्याचं झालं असं की, शुक्रवारी पुजा भट्ट मन्नारा चोप्राला(Mannara Chopra) सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये आली होती.यानंतर ती मीडियाशी बोलली, दरम्यान पुजाने मुनावरबद्दलही मत व्यक्त केलं. मीडियाशी बोलताना बिगबाॅस 2 फेम पुजा सांगितलं की, ती शोमध्ये मन्नारा चोप्राला सपोर्ट करण्यासाठी आली होती. परंतु या शोमधील अरुण महाशेट्टी हे तिचे आवडते कंटेस्टंट आहेत. यावेळी अभिनेत्रीने मुनावरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शोमध्ये झालेल्या चर्चेवरही तिचे मत मांडले.

मुनावरबद्दल काय म्हणाली पुजा
दरम्यान पुजा(Pooja Bhatt) म्हणाली की, ” मी या गोष्टीशी सहमत आहे की, मुनावरची अशी इमेज बनवली गेली आहे. हे बघा जगाचं काम असतं बोलणं आणि आपलं काम असतं विसरुन जाणं. मला या प्लॅटफाॅर्मने खुप काही दिलं आहे. मी जवळपास 8 आठवडे या घरात राहीले आहे. मला इतक तरी माहिती आहे की हा प्लॅटफाॅर्म आपल्याला लहान बनवत नाही आपण आपल्या वागण्याने लहान किंवा मोठे बनत असतो.मला वाटतं मुनावरलाही लायसंस मिळायला हवं. आधीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा मजाक बनला आहे. त्याला आता धीर द्या.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here