Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड आमिर अन् किरणच्या घटस्फोटानंतर पूजा भट्टचे ट्वीट व्हायरल; म्हणाली, ‘अधिकतर लग्न वाईट पद्धतीने…’

आमिर अन् किरणच्या घटस्फोटानंतर पूजा भट्टचे ट्वीट व्हायरल; म्हणाली, ‘अधिकतर लग्न वाईट पद्धतीने…’

बॉलिवूडमधून चांगल्या- वाईट बातम्या नेहमीच येत राहतात. ज्या चाहत्यांना कधी आनंदी, तर कधी हैराण करतात. नुकतेच ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्काच दिला. त्यांच्या घटस्फोटानंतर अनेक कलाकारांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशामध्ये पूजा भट्टची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने लग्न, घटस्फोट आणि सह पालकत्वाबाबत आपला विचार मांडला आहे.

विशेष म्हणजे आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर पूजाचे ट्वीट आले. त्यामुळे सोशल मीडिया युजर्स अंदाज लावत आहेत की, पूजाने आमिर- किरणच्या घटस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Pooja Bhatt Tweet After Aamir Khan Kiran Rao Divorce Announcement Is Going Viral)

पूजाचे ट्वीट
पूजाने ट्वीट करत लिहिले की, “पती आणि पत्नीच्या रूपात वेगळे होण्याच्या निर्णयानंतरही सहपालकत्वाबाबत काहीच नवीन नाही. नाते कागदावर बनत किंवा बिघडत नसतात. ते हृदयावर लिहिले जातात. लग्न तुटल्यानंतरही सन्मानाच्या आधारे नाते कायम राखण्यासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. काही लोकांनाच हे हाताळता येते.”

‘अधिकतर लग्न वाईट पद्धतीने संपुष्टात येतात’
यानंतर पूजाने पुढील ट्वीटमध्ये लिहिले की, “अधिकतर लग्न वाईट पद्धतीने संपुष्टात येतात. जे अशापद्धतीने संपुष्टात येत नाहीत, त्यांना असामान्य रूपात पाहिले जाते. लोक दया आणि करुणापेक्षाही अधिक कटुता आणि द्वेषाला अधिक समजतात. तसेच तेच स्वीकारतात. त्यामुळे अधिक लोक ज्या नात्यात आहेत, त्या नात्याला सामोरे जाण्याऐवजी खोटेपणाचे आयुष्य जगतात.”

पूजाची पोस्ट व्हायरल
खरं तर घटस्फोटानंतर आमिर आणि किरण सातत्याने माध्यमांमध्ये झळकत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी तुटल्याने चाहत्यांसोबतच कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये पूजाने कोणाचेही नाव न घेता, घटस्फोटावर आपले विचार मांडले आहेत. त्यामुळे तिचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा