Thursday, February 22, 2024

We Are Engaged ! म्हणत पूजा सावंतने केली साखरपुड्याची घोषणा, नवऱ्याचे नाव अजूनही गुलदस्त्यात

सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. अनेकजण साखरपुडा करत आहे तर कोणी लग्न करत आहेत. सिनेसृष्टीत देखील अनेकजण लग्न बंधनात अडकत आहे. असेच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत.

पूजा सावंतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये पूजा एका मुलासोबत दिसत आहे. त्या मुलाचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे नक्की तो कोण आहे हे मात्र अजूनही कोणाला कळत नाहीये. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले आहे. तसेच तिच्या बोटात अंगठी दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने “एका खास व्यक्तीसोबत नवीन चाप्टरला सुरुवात करत आहे.” असे लिहिले आहे.

आजपर्यंत पूजा कोणाच्या प्रेमात आहे किंवा तिचं कुणाशी लग्न होणार आहे याची कोणतीही चर्चा नव्हती. परंतु तिने अचानकपणे सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने सगळ्यांना आनंद झाला आहे. सगळेजण सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत आहे. त्याचप्रमाणे तिची बहिण रुचिरा सावंत तिने देखील तिच्या अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे आणि कलाकार देखील तिला शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘झिम्मा 2’ने तीन दिवसात गाठला कोट्यवधींचा पल्ला, जाणून घ्या आकडा
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, पाहा फोटो

हे देखील वाचा