Thursday, April 18, 2024

Pooja Sawant Wedding : पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी…(See Pics)

मराठी मनोरंजनसृष्टी लग्नसोहळ्याचा धुमधडका पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री पुजा सांवत(pooja sawant)हिचा साखरपुडा पार पडला. आता लवकरच अभिनेत्री पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकणार (Pooja Sawant Wedding )आहे. लग्नसोहळ्याला सुरुवात झाली असून तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पूजा आणि सिद्धशचा धम्माल संगीत सोहळा पार पडल्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळाही पार पडला आहे. पूजाच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मेहंदी सोहेळ्यासाठी पूजाने एकदम खास डिझाइन असलेला मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. तर लुकला शोभेल असे दागिने पूजाने परिधान केले होते. यासोहळ्याला परिवारासह अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही उपस्थिती लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

तसेच दुसऱ्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये पूजाचा होणारा नवरा म्हणजेच सिद्धेश दिसला. सिद्धेशचा मेहंदीचा कार्यक्रम काल रात्री पार पडला. यावेळी सिद्धेशने ऑफ व्हाईट कुडता परिधान केला होता. त्याच्या तळ हातावर छोटीसी पूजाच्या नावाची मेहंदी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिद्धेशसोबतच्या नात्याविषयी कबुली दिली होती. त्यानंतर त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. तर मेहंदीसोहळ्यापूर्वी पूजा सिद्धेशचा संगीत सोहळा पार पडला.

संगीत सोहळ्यात पूजा आणि सिद्धेशने रोमँटिक डान्सही केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. संगीत सोहळ्यासाठी पूजाने खास डिझायनर लेहेंगा आणि त्यावर खड्यांची ज्वेलरी घालत ग्लॅमरस लूक केला होता. तर सिद्धेशने सूट परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

पूजाच्या संगीत सोहळ्याला अमृता खानविलकर, सई गोडबोले, मेधा मांजरेकर, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, पुष्कर जोग यांनी हजेरी लावली होती.

२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

हेही वाचा:

सावंतांच्या घरी खास व्याही भोजन; पुजा अन् सिद्धेश लवकरच अडकणार विवाह बंधनात

Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीचा आहे घरगुती व्यवसाय

हे देखील वाचा