Poonam Pandey| काल प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam pandey) हिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून तिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्या असल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्वतः दिली. त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच खूप दुःख झाले होते. अचानक अभिनेत्रीने असा सगळ्यांचा निरोप घेणे अनेकांना पटले नव्हतेm त्याचप्रमाणे तिच्या मृतदेहाबद्दलही अनेक बातम्या येत होत्या.
परंतु आता पूनम पांडेने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याची माहिती दिलेली आहे. आजकाल आपल्या भारतामध्ये कर्करोगाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या खुलासानुसार भारतात तब्बल 14 लाख कॅन्सरचे रुग्ण आहे तर नऊ लाख रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात प्रामुख्याने स्त्रियांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. स्त्रियांना गर्भशयाच्या मुखाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यांचा मृत्यू देखील होतो.
आता पूनम पांडे स्वतः खुलासा करून हा कॅन्सर कसा आपल्याला भेदून काढता येईल आणि त्यावर मात देऊन आपण कशाप्रकारे विजय मिळवला जाईल. याचा खुलासा केलेला आहे. याबद्दलची माहिती तिने तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे दिलेली आहे.
उद्या म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन आहे आणि याच निमित्ताने त्यांनी स्त्रियांना एक संदेश देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा एक मोठा स्टंट केला होता. अशी तिने माहिती दिली आहे आणि त्याबद्दल तिने सगळ्यांचे माफी देखील मागितलेली आहे.
पुनम ने केलेला हा प्रयत्न जरी चांगली गोष्ट सांगण्यासाठी केला असला तरी आता अनेकजण तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. कारण तिच्या चाहतांना तिच्या मृत्यूच्या बातमीने खूप त्रास झाला असे अनेकजण म्हणत आहे. परंतु समाजातील स्त्रियांना काहीतरी चांगली गोष्ट शिकवण्यासाठी पुनम पांडेने हा प्रयत्न केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिषेक-ईशाच्या नात्यावर अभिनेत्रीच्या आईचा होता आक्षेप, म्हणूनच समर्थची झालेली एंट्री
‘ऍनिमल’ला स्त्रीविरोधी म्हटल्यावर संदीप रेड्डी यांचे किरण रावला प्रत्युत्तर; म्हणाले, ‘आमिर खान चित्रपटात महिलेला जबरदस्ती…’