‘भारताने वर्ल्डकप जिंकला, तर न्यूड होईल’, म्हणणाऱ्या पूनम पांडेचे भारत- न्यूझीलंड सामन्याबद्दल धक्कादायक वक्तव्य


मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्डनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा पूनम चर्चेत आली आहे. तिने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल असे काही वक्तव्य केले आहे की, ज्यामुळे ती खूप चर्चेत आहे. (Poonam Pandey was questioned in india and new zealand match)

स्पॉट बॉयच्या वृत्तानुसार, नुकतेच माध्यमांशी चर्चा करताना पूनमने भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर हैराण करणारे उत्तर दिले आहे. जे ऐकून तिचे चाहतेही चकित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पूनम तिचा पती सॅम बॉम्बेसोबत रेशन वाटायला गेली होती, तेव्हा तिने माध्यमांना उत्तर दिले आहे.

माध्यमांनी पूनमला विचारले की, भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्याबद्दल तू काय सांगशील? यावर तिने उत्तर दिले की, “क्रिकेट चालू आहे का?? लोकं क्रिकेट खेळतात का?? तर तुम्हाला काय वाटतं मी पुन्हा एकदा स्ट्रिप होण्याबद्दल बोलू??” एवढंच नाही तर अभिनेत्रीचा पती म्हणाला की, “मी स्ट्रीप करू का?” यावर ती म्हणाली की, “नको नाहीतर भारत पराभूत होईल.” पूनम पांडेचे हे उत्तर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पूनम 2011 मध्ये देखील खूप चर्चेत आली होती. जेव्हा ती म्हणाली होती की, “जर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला, तर मी न्यूड होईल.” एवढंच नाही तर माध्यमांतील वृत्तानुसार, पूनम पांडेने या संदर्भात बीसीसीआयला एक पत्र देखील लिहिले होते.

पूनम पांडेने 2020 साली तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच ती खूप चर्चेत आली होती. कारण तिने काही दिवसातच तिच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यासोबतच तिने पतीवर मारहाण केल्याचाही गंभीर आरोप लावला होता. पूनमने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘नशा’ या चित्रपटातून केली होती. तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने बोल्डनेसचा तडका लावला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.