Thursday, November 21, 2024
Home अन्य प्रसिद्ध गायकाचे दुःखद निधन, मार्च महिन्यातच कोमातून बाहेर आला होता

प्रसिद्ध गायकाचे दुःखद निधन, मार्च महिन्यातच कोमातून बाहेर आला होता

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर तरसेम सिंग सैनी (Tarsame Singh Saini) याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘नाचेंगे सारी रात’ फेम हा गायक ताज नावाने प्रसिद्ध होता. शुक्रवारी (२९ एप्रिल) रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, त्याला हर्नियाचा त्रास होता आणि यकृत निकामी झाल्यामुळे तो कोमातही गेला होता. मात्र गायक आयुष्याची ही लढाई हरला. त्याच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ताजवर गेल्या दोन वर्षांपूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि तो कोमात गेला. या वर्षी मार्चमध्ये तो कोमातून बाहेर आला आणि त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणाही झाली होती. पण आता महिनाभरानंतरच त्याचे निधन झाले. (pop singer tarsame singh saini aka taz passes away at the age of 54)

गायक बल्ली सागूने ट्विटरवर ताजसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “आरआयपी भाई, तुझी खूप आठवण येईल.” त्याचबरोबर अमाल मलिकनेही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माते गुरिंदर चढ्ढा यांनी इंस्टाग्रामवर ताजसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “हे ऐकून मन हेलावलं आहे.”

 

ताज १९८९ मध्ये ‘हिट द डेक’ अल्बमने लोकप्रिय झाला होता. त्याने ‘नाचेंगे सारी रात’, ‘प्यार हो गया’, ‘दारू विच प्यार’ इत्यादी लोकप्रिय गाणी रसिकांना दिली. जॉन अब्राहमच्या २०१९ मध्ये आलेल्या ‘बटला हाऊस’ या चित्रपटातील ‘गल्ला गोरियां’ या गाण्यात त्याने शेवटचा अभिनय केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा