Tuesday, April 23, 2024

धक्कादायक: मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाची आत्महत्या

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय तेलगू डान्स शो असलेल्या ‘धी’मध्ये दिसणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर चैतन्याने आत्महत्या केली आहे. चैतन्यने ३० एप्रिल २०२३ रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त असमर्थ ठरत होता आणि यामुळे तो नैराश्यात होता. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

चैतन्यने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “माझी आई, वडील आणि बहिणीने मला कोणतीही समस्या न येऊ देता माझी खूप चांगली काळजी घेतली. मी माझ्या सर्व मित्रांची माफी मागतो. मी खूप लोकांना नाराज केले यासाठी मी सर्वांची माफी मागतो. पैशासाठी मी माझा चांगुलपणा घालवून बसलो. नुकते कर्ज घेऊन चालत नाही तर ते फेडता देखील आले पाहिजे. मात्र दुर्दुवाने मी ते करू शकलो नाही. मी आता नेल्लोरमध्ये असून, हा माझा शेवटचा दिवस आहे. कर्जाशी संबंधित समस्या मी आता सहन करू शकत नाही.” या व्हिडिओनंतर चैतन्यने नेल्लोर क्लबमध्ये आत्महत्या केली आहे.

चैतन्यच्या आत्महत्येनंतर त्याचे फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील लोकं दुखी असून, ते आता त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर चैतन्याचा शेवटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून, त्याचे फॅन्स त्याला आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. असे सांगत आहे. दरम्यान चैतन्य हा लोकप्रिय डान्स शो असलेल्या ‘धी;चा नृत्यदिग्दर्शक होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘भारतात समस्या…मात्र दुबईत मी सुरक्षित’ जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने सोडले मौन

पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

हे देखील वाचा