Saturday, June 29, 2024

गायक सोनू निगमने ‘पद्मश्री’ पुरस्कार स्विकारण्यास दिला होता नकार; स्वत:च सांगितलं कारण

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) आपल्या जादुई आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत असतो. त्याच्या आवाजाचे चाहते देशभर आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या गाण्यांइतकाच तो त्याच्या वादामुळेही सतत चर्चेत असतो. सोनू निगम आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गायक सोनू निगमला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र एका मुलाखतीत बोलताना सोनू निगमने हा पुरस्कार मी घेणार नसल्याचे धक्कादायक विधान केले होते. ज्यावेळी सोनू निगमला हा पुरस्कार घेणार का असे विचारण्यात आले होते, त्यावेळी त्याने याबद्दलचे विधान केले होते. त्याच्या मते हा पुरस्कार द्यायला खूप उशीर केला आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगम म्हणाला, “तुम्ही मला आता पद्मश्री देत ​​आहात का? तुम्ही खूप दिवसांपासून मला चिडवत आहात? मी सुद्धा माणूस आहे आणि आपणही या मोहात अडकतो. एका मोठ्या पुरस्काराने गौरविले जाईल तर ते कोणाला आवडणार नाही? योग्य वेळी प्रशंसा आणि मान्यता मिळणे ही एक चांगली भावना आहे. उशिरा मिळालेला न्याय याला न्याय म्हणत नाहीत. मी हा पुरस्कार स्वीकारू शकणार नाही.”

“या पुरस्काराबद्दल माझे नाव कोणी सुचवले हे मलाही माहीत आहे. ते उत्तम शास्त्रीय गायक आहेत. मी एक दिवस त्याला विचारेन की मी त्याचे नाव उघड करू शकेन की नाही. सर्व काही खूप सुंदर रीतीने घडले आहे,”अशी आनंदी प्रतिक्रिया ही त्याने यावेळी दिली. पद्मश्री म्हणजे देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सोनू निगमला गौरविण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील त्याच्या असामान्य योगदानाबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोनूने देशातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा