भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टरांनी लतादीदींच्या प्रकृतीबाबत अपडेट्स दिले असतानाच, सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रवक्त्याने चाहत्यांना अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन केले होते. लताजींच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले होते.
अशातच आता लतादीदींच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती देत, स्वतः डॉक्टरांनी चाहत्यांना अफवा पसरवू नका असं आवाहन केलं आहे. डॉक्टर प्रतित सामदानी यांनी लता मंगेशकर यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. (positive signs of improvement are visible in lata mangeshkar the doctor said do not spread rumours)
Heartfelt request for the disturbing speculation to stop.
Update from Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital.
Lata Didi is showing positive signs of improvement from earlier and is under treatment in the ICU.
We look forward and pray for her speedy healing and homecoming.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 22, 2022
काय लिहिलंय पोस्टमध्ये?
या पोस्टमध्ये लिहिलंय की, “आम्ही तुम्हाला चुकीची माहिती न पसरवण्यासाठी कळकळीची विनंती करत आहोत. कृपा करून खोट्या बातम्या पसरवणं थांबवा,” असं आवाहन या पोस्टद्वारे करण्यात आलं आहे. तसेच वय लक्षात घेऊन खबरदारी म्हणून त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान