आजकाल चित्रपटसृष्टीमध्ये अनेक इतिहासातील घटना प्रेक्षकांसमोर आणून, त्यांना पुन्हा एकदा इतिहासाकडे घेऊन जाते. असाच एक इतिहासाकडे घेऊन जाणारा चित्रपट ‘बलोच’. इतिहासातील पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी करावी लागली होती. हे भयाण वास्तव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर उभं करणारा प्रवीण तरडेंचा ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Poster of baloch movie release, audience are very excited for upcoming film)
‘बलोच’ या चित्रपटाचा पोस्टर नुकताच व्हायरल झाला आहे. हा पोस्टर प्रवीण तरडे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या डोळ्यात धगधगती आग दिसत आहे. पिळदार मिशा या अशा रांगड्या अवतारात ते दिसत आहेत. मराठ्यांनी दिलेल्या या लढ्याची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार करणार आहेत. या चित्रपटाचे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. विश्र्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे.
जीवन जाधव, जितेश मोरे, नेमारमा चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे हे आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अनेकजण प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या या पोस्टरवार प्रतिक्रिया देत आहेत, तसेच या चित्रपटाची ते आतुरतेने वाट पाहत आहे, असे देखील प्रेक्षक सांगत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पवनदीप राजनच्या आवाजाचे केले करिश्मा कपूरने कौतुक; परफॉर्मन्सच्या मध्येच पोहोचली स्टेजवर