Friday, May 24, 2024

HBD साऊथची धकधक गर्ल ‘नयनतारा’: प्रभुदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला मात्र….

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात हॉट अभिनेत्रींच्या यादीत नयनतारा हिच्या नावाचा समावेश आहे. नयनताराने तिच्या अभिनयाने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती खूप चर्चेत राहिली आहे. नयनतारा शनिवारी (18 नोव्हेंबर ) तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

नयनताराचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 मध्ये बंगळुरूमध्ये झाला. नेहमीच चर्चेत असणारी नयनतारा खास करून दोन कारणांमुळे खूप चर्चेत होती. एक तर तिने साऊथ सुपरस्टार आणि डान्सर प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी इसाई धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. तसेच दुसरे कारण म्हणजे तिने शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात आयटम साँग करण्यास नकार दिला होता.

रजनीकांत यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘चंद्रमुखी’ मध्ये अभिनेत्री नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. ती मुळात इसाई धर्माची होती. तिचा जन्म बंगळुरूमध्ये कट्टर इसाई कुटुंबात झाला होता. तिचे खरे नाव डायना मरियम कुरियन हे आहे. तिचे वडील कुरियन कोडियात्तू एअर फोर्समध्ये होते. तसेच आई ओमाना कुरियन हाऊसवाईफ होती. एअर फोर्समध्ये असल्या कारणाने ती अनेक शहरांमध्ये राहिली आहे. त्यामुळे नयनताराचे शिक्षण देशातील अनेक शहरांमध्ये झाले आहे.

प्रभुदेवाने तमिळ चित्रपट ‘विल्लू’मध्ये नयनताराला कोरीओग्राफ केले होते. या शूटिंग दरम्यान दोघांना प्रेम झाले. तिने 2007 मध्ये प्रभुदेवाला डेट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षानंतर 2010 मध्ये प्रभूदेवाची पत्नी रमालताने याचिका दाखल केली की, प्रभुदेवा आणि आणि नयनतारा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

एवढंच नाही तर, प्रभुदेवाच्या पत्नीने धमकी दिली होती की, त्याने नयनतारासोबत लग्न केले, तर ती भूक हाडतालवर बसेल. तिला पाठींबा देत अनेक महिलांनी एकत्र येऊन नयनतारावर तमिळ संस्कृती बदनाम केल्याचा आरोप लावला होता. तिचा पुतळा देखील उभा केला होता.

नयनतारासोबत असलेल्या अफेअरसाठी प्रभुदेवाने लग्नाच्या 16 वर्षानंतर पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुलै २०११ मध्ये त्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला. परंतु वर्षभरातच 2022 मध्ये नयनताराने सांगितले की, तिने प्रभुदेवासोबत असलेले नाते तोडले आहे. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रभुदेवा कंगाल झाला होता. त्याने त्याच्या पत्नीला 10 लाख रुपये आणि काही प्रॉपर्टी दिली होती. जिची किंमत 20-25 कोटी एवढी होती. तसेच दोन कार दिल्या होत्या.

नयनताराने शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात आयटम साँग करण्यास नकार दिला होता. तिच्याबाबत असे म्हटले जाते की, शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार देणारी कदाचित ती पहिलीच अभिनेत्री असावी. असे म्हटले जाते की, तिने हा चित्रपट शाहरुख खान आणि रोहित शेट्टी नाही तर प्रभुदेवामुळे सोडली होती. प्रभुदेवाने या चित्रपटात गाणी कोरीओग्राफ केली होती. (sauth actress nayatara celebrate her birthday lets know about her)

हे देखील वाचा