Friday, March 14, 2025
Home मराठी प्राजक्ता माळीला मिळाले ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ याचे उत्तर, व्हिडिओ केला शेअर

प्राजक्ता माळीला मिळाले ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ याचे उत्तर, व्हिडिओ केला शेअर

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेली प्राजक्ता माळी आपल्या उत्तम अभिनयासाठी, फिटनेससाठी, डान्ससाठी, सौंदर्यासाठी आणि सूत्रसंचालनाची ओळखली जाते. प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर किती सक्रिय आहे हे वेगळे सांगायला नको. ती तिच्या आयुष्यातील लहानमोठ्या सर्वच गोष्टींची माहिती तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तुफान लाईमलाइटमध्ये येत असते. प्राजक्ता फक्त तिच्याशी संबंधितच पोस्ट शेअर करते असते आणि तर सामाजिक मुद्द्यांवर देखील ती तिची मतं मनमोकळेपणाने मांडताना दिसते.

नुकतीच प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला पडलेल्या “सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या प्रश्नाचे उत्तर सापडल्याचे सांगितले आहे.” यासोबतच तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. सध्या आंब्यांचा सिझन सुरु असून प्रत्येक जणं आंब्यांवर ताव मारताना दिसत आहे. यात प्राजक्ताचे कुटुंब देखील मागे नाही.तिचे संपूर्ण कुटुंब नुकतेच आंब्यांचा आस्वाद घेताना दिसले. याचा एक मजेशीर व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या दोन भाच्या आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. व्हिडीओत प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत “तुला अजून काय हवं, असे प्राजक्ता तिच्या एका भाचीला विचारते, यावर ती आंबा असे उत्तर देते. पुढे ती तुला आंबा आवडतो का? असा प्रश्न प्राजक्ता करते, त्यावर ती खूप आवडतो, असे उत्तर ती देते.” हा व्हिडिओ पोस्ट करताना प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सहकुटूंब सहपरिवार, स्वतःच्या बागेत बसून, ह्या पिल्लांना (भाच्यांना), रसाळ “हापूस” आंब्यांवर ताव मारताना बघणं आणि स्वतःही नंतर आडवा हात मारणं… म्हणजे..सुख म्हणजे नक्की काय असतं ; ह्याचं उत्तर सापडणं आहे…” यासोबतच तिने #उन्हाळ्याचीसुटीचाfeel #माळ्यांचीबाग#माळ्यांच्यापोरी आणि त्यांच #आम्रप्रेम असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा