Monday, June 24, 2024

प्रकाश झा यांच्या चित्रपटामुळे बदलले ‘या’ अभिनेत्याचे आयुष्य

बॉलिवूडमधील मोठे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन केले नाही तर अनेक सामाजिक प्रश्नांना देखील समोर आणले आहे. प्रकाश झा यांनी ‘हिप हिप हुररे’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग त्यांनी रांची येथे केले होते. या चित्रपटाचे स्क्रीन प्ले आणि मुझ्यिक गुलजार यांनी दिले होते. राज किरण यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. खेळावर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रकाश झा यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. पुढे याच प्रकाश झा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले.  त्यांच्या अशाच चित्रपटांबद्दल आज जाणून घेणार आहोत.

गंगाजल
2003 मध्ये रिलीज झालेल्या गंगाजल या चित्रपटाने त्यांच्या इतर सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. अजय देवगण याला एका वेगळ्याच भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले होते. या चित्रपटाचे अनेक डायलॉग आणि सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटाला अनेक नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले आहेत.

अपहरण
2005 मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण आणि प्रकाश झा यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली होती. बिहारमध्ये होणारे अपराध ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून प्रकाश झा यांनी हा चित्रपट बनवला होता. अजय देवगण सोबत या चित्रपटात बिपाशा बसू ही मुख्य भूमिकेत होती. तसेच नाना पाटेकर आणि यशराज शर्मा यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली होती. 2006 मध्ये झालेल्या फिल्म फेअर पुरस्कारांमध्ये नाना पाटेकर यांना उत्कृष्ट खलनायक म्हणून या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता.

राजनीती
2010 मध्ये प्रकाश झा यांनी भारतातील राजकारणतील अनेक डावपेच राजनीती या चित्रपटात मधून प्रेक्षकांसमोर मांडले. या चित्रपटात कतरिना कैफ, अजय देवगण, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत दिसले होते. तसेच प्रीतम चक्रवर्ती, शांतनू मोईत्रा, आदेश श्रीवास्तव यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटाची पटकथा मुख्यतः भारतातील राजकारण आणि महाभारत यांच्यावर आधारित होती.

आरक्षण
2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या आरक्षण या चित्रपटातला अनेक विरोधाचा सामना करावा लागला होता. प्रकाश झा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते तर सैफ आली खान आणि दिनेश विजण या चित्रपटाचे निर्माते होते. आरक्षण हा चित्रपट मुख्यतः आपल्या शिक्षण क्षेत्रातील अनेक घडमोडींवर अवलंबून होता. शिक्षण क्षेत्रात होणारे फायदे तोटे या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणण्यात आले होते.

जय गंगाजल
2003 मध्ये आलेल्या गंगाजल या चित्रपटाचा जय गंगाजल हा दुसरा भाग होता. परंतु दोन्ही चित्रपटाची कथा खूप वेगळी होती. प्रियांका सोबतच मानव कौल, राहुल भट्ट, निनाद कामात हे मुख्य भूमिकेत होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल नाही करू शकला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Birthday Special | ‘धर्मा’ चित्रपटाने बदललं प्रकाश झा यांचं नशीब, अजय देवगणलाही त्यांनीच बनवलं ‘सुपरस्टार’
दाक्षिणात्य गायिकेचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण

हे देखील वाचा