टेलिव्हिजनपासून चित्रपटसृष्टीपर्यंत यशस्वीरीत्या प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. तिच्या करिअरच्या प्रवासाला सुरुवात झाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेत तिने अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीचे पात्र निभावले होते. यातून तिला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मग तिच्या करिअरची गाडी अशी धावली की, तिला लागोपाठ चित्रपट मिळाले आणि तिने खूप प्रसिद्धी मिळवली. प्रार्थना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच शेअर करत असते. अशातच तिचा नवीन लूक समोर आला आहे. तिने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू की, ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा लाँग ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिने केस कर्ली करून कानात ईअरिंग घातले आहे. ज्यात तिचे रुप अगदी खुलून दिसत आहे.
हे फोटो शेअर करून तिने “नवीन मी,” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लूक आवडलाच आहे. सोबतच अनेक कलाकारांना देखील हा लूक खूप आवडला आहे. या फोटोवर स्वप्नील जोशीने “गोर्जिअस,” अशी कमेंट केली आहे, तर मंजिरी ओक हिने “सुंदर,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते देखील कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
प्रार्थना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची एक झलक बघण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झालेले असतात. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत तिच्यासोबत श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. त्यांची ही मालिका सगळ्यांना खूप आवडत आहे.
हेही वाचा :