Monday, July 1, 2024

Viral Video| परीच्या वाढदिवशी प्रार्थना बेहरेने दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली, ‘तु माझ्यासाठी…’

मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी मुख्य भूमिकेत काम केले होते. यांच्या मालिकेसोबतच ही जोडीदेखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यश आणि नेहाच्या लव्हस्टोरीने चाहत्यांवर भुरळ घातली असून त्यांची केमिस्ट्री देखिल सगळ्यांनाच आवडली. या दोघांशिवया यामधील परीची भूमिका साकारणारी बाल कलाकार मायर वायकुळकर हिच्या अभिनयाचे देखिल प्रचंड कौतुक झाले. रविवार (दि, 22 जानेवारी ) रोजी मायर वायकुळ आपला वाढदिवस साजरी करते. अशातच प्रार्थनाने परीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेतून मुख्य कलाकारांशिवाय बालकलाकारांच्या भूमिकेला देखिल प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकामधील अमाप प्रसिद्धी मिळवणारी परी म्हणजेच मायर वायकुळ (Myra Vaikul) हिच्या वाढदिवसानिमित्त ऑनस्क्रीन तिची आई म्हणजेच प्रार्थना बेहरे हिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना आणि परीची केमिस्ट्रीदेखिल प्रेक्षकांना भावली होती. पडद्यावरच नाही तर पडद्यामागे देखिल यांची जोडी खूपच छान रमली होती. पार्थना सतत त्यांचे फोटो शेअर करत चाहत्यांना त्याच्या नात्याबद्दल सागंत असे. परीच्या वाढदिवशी देखिल तिने दोघींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

प्रार्थनाने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्यासाठी खूप खास आहेस परी. मला तू मोठी व्हायला नको आहेस. तू आहेस तशीच राहा आणि संपूर्ण जगाला तुझ्याभोवती फिरवत राहा. देवाने आमच्यासाठी पाठवलेली तू सर्वात क्युट स्टार आहेस.” व्हायरल व्हिडिओत मायरा सुंदर फ्रॉक घालून ऑरेंज ज्युस पिताना दिसून येत आहे. तिच्या शेजारी प्रार्थना बसली असून दोघीही खुर्चीवर बसून डान्स करतना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने परीला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या रंगाची साडी नेसून जान्हवी उतरली पाण्यात, फाेटाे बघताच युजर्सला आठवली ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी
दीपिकाने दिली गाेड बातमी; पाेस्ट शेअर करत म्हणाली, ‘अलहमदुलिल्लाह…’

हे देखील वाचा