Thursday, March 28, 2024

श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे(Shreyas Talpade). तो सध्या छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसत आहे. आता लवकरच त्याचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच श्रेयसचा बेबीफेसवाला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

“आपडी थापडी” या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत “आपडी थापडी” हे बडबडगीत म्हटलं आहे.”आपडी थापडी” हा चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडीथापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे.

कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटीलची गोष्ट
अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या कंजुषीची उदाहरणं चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला पाहता येतात. पण या बरोबरच या कथेला एक भावनिक किनार असल्यांचही टीजरमधून दिसतं. त्यामुळे टीझर पाहून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला दसऱ्याची वाट पाहावी लागणार आहे. आता उत्सुकता आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. ‘आपडी-थापडी’ ही एक मनोरंजक कथा सहकुटुंब चित्रपटगृहात पाहता येईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

रुपाची खान, दिसती छान! अरबाजची गर्लफ्रेंड आहे खूपच संंदर अन् ग्लॅमरस; अशी केली बॉलिवूड एन्ट्री
‘बिग बॉस’ने बदललं सृष्टीचं आयुष्य, झालेला साखरपुडा मोडून आता बनलीय कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड
सुष्मिता सेनच्या वहिनीचा मोठा निर्णय! घटस्फोटाच्या एका रात्रीआधीचा सांगितला किस्सा

हे देखील वाचा