मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली होती. जुलै महिन्यात दोघांनी साखरपुडा केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर आता या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
प्रसाद (Prasad Jawade) आणि अमृताने अद्याप लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत, मात्र त्यांचा सप्तपदी घेतानाचा एक फोटो अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमृता आणि प्रसादचा पारंपरिक लूक पाहायला मिळतो. अमृताने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, तर प्रसादने पिवळ्या रंगाचा पितांबर नेसला आहे. दोघांच्याही पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमृताने शेअर केलेल्या ग्रहमखाच्या फोटोपासून चाहते त्यांच्या लग्नाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रम ही मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. या कार्यक्रमाला अनेक मराठी सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच आता त्यांच्या लग्नसोहळ्यातही अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली होती. .
या दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दोघे ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. अमृता तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट करत असतात.
View this post on Instagram
दोघांच्याही करिअरबद्दल सांगायचं झालं, तर अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात काम करत आहे, तर प्रसाद जवादे शेवटचा ‘काव्यांजली’ या मालिकेत झळकला होता. या दोघांच्या लग्नामुळे मराठी कलाविश्वात आनंदाचे वातावरण आहे. (Prasad Jawade Amrita Deshmukh wedding ceremony was completed in grandeur see photos)
आधिक वाचा-
–चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य
–अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी