Thursday, November 21, 2024
Home मराठी ‘अविरत राहिली ती फक्त तुझी साथ’, लग्नाच्या २४ व्या वाढदिवशी प्रसाद ओककडून पत्नीला खास शुभेच्छा

‘अविरत राहिली ती फक्त तुझी साथ’, लग्नाच्या २४ व्या वाढदिवशी प्रसाद ओककडून पत्नीला खास शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने त्याच्या अभिनयाच्या आणि टॅलेंटच्या जोरावर नाव कमावले आहे. अगदी शून्यातून त्याने त्याच्या या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या पत्नीने म्हणजेच मंजिरी ओक हिने मोलाची साथ दिली आहे. तिने प्रत्येक प्रसंगात त्याला उभारी दिली आहे. त्याच्या पत्नीसाठी त्याने अनेकवेळा कविता आणि लेख लिहिले आहेत. अशातच हे जोडपे शुक्रवारी (७ जानेवारी) रोजी त्यांच्या लग्नाचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर पत्नीसोबत काही फोटो शेअर करून तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिच्यासाठी खास कॅप्शन देखील दिले आहे.

प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांनी वाढदिवस साजरा केल्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत प्रसाद मंजिरीला केक भरवताना दिसत आहे. दोघेही फोटोमध्ये खूप खुश दिसत आहे.(prasad oak and manjiri oak celebrate their 24 th wedding anniversary)

हे फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “आज आमचं लग्न २५ व्या वर्षात पदार्पण करतंय. एवढ्या मोट्ठ्या काळात आयुष्याचे अनेक चढउतार पाहिले. अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले. अनेक माणसं, अनेक नाती जोडली, तुटली सुद्धा. या सगळ्यात अविरत राहिली ती फक्त तुझी सोबत, तुझी साथ आणि तुझं प्रेम.
माझे शब्द संपले म्हणून एवढंच म्हणतो, ना अजून झालो मोठ्ठा, ना स्वतंत्र अजुनी झालो, तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो.”

त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या फोटोवर सोनाली कुलकर्णी हिने कमेंट केली आहे की, “तुम्ही दोघेही या फोटोमध्ये २५ वर्षाचे दिसत आहेत. कुठली एनिवर्सरी आहे मग नक्की.” तसेच त्यांच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, सोनाली खरे, नेहा पेंडसे, आदिनाथ कोठारे यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद आणि मंजिरीचे लग्न ७ जानेवारी १९९८ मध्ये झाले. मंजिरीने प्रसादच्या एका अभिनयाच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यांची पहिली भेट झाली. हे वर्कशॉप जवळपास ३ महिन्यांचे होते. या दरम्यान त्या दोघांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. परंतु त्यांच्यातील कोणीच एकमेकांना प्रपोझ केले नाही. कालांतराने त्यांना जाणवले की, ते एकमेकांसोबत आयुष्य घालवू इच्छितात. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

‘भोजपुरी क्वीन’ निधीच्या ‘या’ नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, अभिनेत्रीचे लटके- झटके वेधतायत सर्वांचे लक्ष

अशाप्रकारे झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या सेटवर प्रार्थना बेहरेचा वाढदिवस साजरा, फोटो आले समोर

Oops Moment! खूपच पारदर्शक ड्रेसमध्ये पार्टीत पोहोचली होती प्रियांका, छोट्याश्या बॅगने वाचवली लाज

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा