बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे पसंत करते. प्रियांका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. प्रियांका तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या स्टाईलमध्ये आणखी बदल केला आहे, पण काहीवेळा ती प्रयोग करताना ती इतकी बोल्ड होते की, हीच फॅशन तिच्या अंगलट येते. असेच काहीसे एकदा एका पार्टीत झाले.
प्रियांका निक जोनाससोबत पोहोचली होती डिनरला
प्रियांका (Priyanka Chopra) अनेकदा तिच्या उत्कृष्ट स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचा अंदाज प्रत्येक वेळी शानदार असतो. अभिनेत्रीचा कोणताही लूक समोर येताच तो व्हायरल होतो. पण कधी-कधी अधिक स्टायलिश दिसण्याच्या नादात ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे. असाच प्रकार एकदा झाला होता, जेव्हा ती पती निक जोनाससोबत (Nick Jonas) डिनरला आली होती आणि यावेळी तिच्या ड्रेसने तिचा विश्वासघात केला होता.
प्रियांकाचा ड्रेस
प्रियांकाला तिच्या पतीसोबत डिनर पार्टीला जायचे होते आणि तिथे जाण्यासाठी तिने निवडलेला ड्रेस खूपच रिस्की होता. प्रियांकाच्या या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोल देखील केले गेले आणि त्याचे कारण म्हणजे ड्रेसचा पारदर्शक लूक आहे. होय, प्रियांकाने परिधान केलेल्या ड्रेसच्या वर एक साधा ब्लॅक स्लीव्हलेस टॉप होता, पण ड्रेसच्या खाली, हिरव्या आणि काळ्या रंगात बनवलेल्या फुलांच्या पॅटर्नसह काळ्या रंगात एक पारदर्शक फ्लोरल स्कर्ट होता.
छोट्या बॅगने वाचवले ऊप्स मोमेंटची शिकार होण्यापासून
प्रियांका चोप्रा ती जे काही परिधान करते ते पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी करते. परंतु पेहरावाच्या पारदर्शकतेमुळे प्रियांका अनेक फोटोंमध्ये खूपच अस्वस्थ दिसली आहे. मात्र, यावेळी प्रियांकाच्या हिरव्या छोट्याशा बॅगने तिला साथ दिली आणि तिला ऊप्स मोमेंटची शिकार होण्यापासून वाचवले.
ऊप्स मोमेंटची शिकार होणारी प्रियांका ही एकमेव अभिनेत्री नसून, तिच्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना याचा सामना करावा लागला आहे.
प्रियांकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. याव्यतिरिक्त ती ‘सिटाडेल’ आणि ‘ट्क्स्ट फॉर यू’ यांसारख्या अनेक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हेही नक्की वाचा-
- दु:खद! प्रसिद्ध हॉलिवूड लेखक-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, सत्तरच्या दशकावर केले राज्य
- शाहरुख खानची लाडकी लेक ग्लॅमरस पोझ देत म्हटली ‘असे’ काही, कमेंट्सचा आला पूर!
- दत्तक मुलगी निशाचा हात न धरल्याने ट्रोल झाली सनी लिओनी; पती म्हणाला, ‘ती माझ्या घरची राजकुमारी आहे’
हेही पाहा-