Sunday, April 14, 2024

प्रसाद ओकच्या यशस्वी कारकिर्दीत ‘या’ व्यक्तीचा सिंहाचा वाटा

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता प्रसाद ओक याचा आज वाढदिवस. लोकप्रिय अभिनेत्याचा जन्म 17 फेब्रुवारी 1975 रोजी झाला. दिग्दर्शक, लेखक, गायक, अँकर, कवी आणि चित्रपट निर्माता अशा वेगवेगळ्या भुमिकांमध्ये आपल्याला दिसतो. त्याच्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 2007 मध्ये त्यांनी सा रे ग म प या शो मध्ये भाग घेतला त्यातही त्याने बाजी मारली. त्याला ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटासाठी मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच त्याच्यासाठी 2022 हे वर्ष खऱ्या अर्थाने खूपच खास होते. याच वर्षात त्याचा शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. यात त्याने खुद्द आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमाला दर्शकानी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. चला तर आज अष्टपैलू अभिनेत्याचा चित्रपट प्रवास जाणुन घेऊ या…

प्रसादच्या करियरमध्ये पत्नीचा मोठा वाटा
प्रसादच्या (Prasad Oak) आजवरच्या करियरमध्ये त्याची पत्नी मंजिरी (Manjiri Oak) हिचा फार मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी या दोघांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत कायम चर्चेत असते. प्रसाद पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिकत होता. प्रसाद कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनयाचं वर्कशॉप घ्यायचा. या वर्कशॉपमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मंजिरी सुद्धा त्या काळात अभिनय करायची. काहीतरी शिकायला मिळेल, आणि पुढे एकांकिकेत काम मिळेल या भावनेने मंजिरीने सुद्धा प्रसादच्या वर्कशॉप मध्ये भाग घेतला होता.

हे देखील वाचा