हिंदी चित्रपटांद्वारे प्रमानेच मराठी सिनेसृष्टीमध्ये देखिल बायोपिकचा भडीमार सुरु झाला आहे. सुबोध भावे याने ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’, ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ तसेच नाना पाटेकर ‘प्रकाश बाबा आमटे’, यासरख्या अनेक महान व्यक्तींवर बायोपिक बनवले गेलेत. आता मराठीमधील अजून एक दिग्गज अभिनेता निळू फुले यांच्या आयुष्यावरही बायोपिक बनत आहे. त्यांनी 250 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून अभिनय क्षेत्रामध्ये मोलाचं स्थान निर्माण केलं आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हा लवकरच दिग्गज अभिनेता निळू फुले (Nilu Phule) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: प्रसाद करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना अभिनेत्याने जाहीर केले होते की, “या चित्रपटाची तयारी सुरु झाली आहे.”
निळू फुले यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार किंवा कोणकोणते कलाकार या चित्रपटाचा भाग असतील या बद्दल अभिनेत्याने गुपित ठेवलं आहे म्हणजेच याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही. त्याशिवाय प्रसादने सोशल मीडियावर निळु फुले यांच्या वाढदिवशी एक पोस्टही शेअर केली होती. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये निळू फुलेंची मुलगी गार्गी यांना देखिल टॅग केलं होतं. या पोस्टद्वारे अभिनेत्याने निळु फुलेंविषयी आपल्या भावना व्यक्त करत चित्रपटाबद्दल माहिती सांगितली होती.
View this post on Instagram
प्रसाद धर्मवीर 2 लवकर चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्याशिवाय धर्मवीर चित्रपटामध्ये प्रसादची भूमिका देखिल चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. सध्या अभिनेता मराठी वाहिवनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये परिक्षण करत आहे.(prasad oak started working on legandary marathi actor nilu phule biopic see here)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ