मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकार आणि नाट्यप्रेमी प्रशांत दामले यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमधील वेगळीच छाप सोडली आहे. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ मराठी चित्रपट नाटकामध्ये रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्रशांत दामले यांच्याविषयी खूप आनंदाची बातमी समोर येत आहे.
मराठी रंगभूमीवरील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतंच सोशल मीडिवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना आपल्या ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळल्याचे आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आजपर्यत त्यांनी मराठी नाटकांमध्ये आणि चित्रपटांमधील योगदान पाहून कलाकारांनीही त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका नाट्यगृहामध्ये त्यांच्या कारकीर्दीमधील 12 हजार 500 वा प्रयोग सादर केला होता, तेव्हा त्यांच्या नाटकाला माराष्ट्राचे मुख्यानंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मनसे पक्षाचे आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रशांत दामलेंचे कौतुक करत त्यांना गौरवास्पद कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावत अभिनेत्याचे कौतुक केले होते.
दामले यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला.. असच प्रेम असूदे” या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी शेअर केल्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दामले यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आगहे. त्यांचे नाकट मोरुची मावशी, टुरटुर, आणि महाराष्ट्राची लोकधारा, या नाटकांना प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतले आहे. सर्वाधिक गाजलेलं नाटक म्हणजे मोरुची मावशी, आजही या नाटकाचे कौतुक करत लोक आवर्जुन पाहात असतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भिकू म्हात्रे इस बॅक!’ मुंबई का किंग म्हणत मनोज वाजपेयीने शेअर केली पोस्ट, परततोय का सत्या 2?
सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क