मराठी मनोरंजनविश्वात अतिशय उत्तम लेखक आहेत. शिवाय मराठी साहित्य क्षेत्र देखील अतिशय प्रतिभावान लेखकांनी प्रगल्भ आहे. त्यामुळेच या क्षेत्रात खूपच उत्तम नाटकं तयार होत असतात. नाटकांची पहिल्यापासून एक सुंदर आणि प्रतिभावान परंपरा मराठी मनोरंजनाविश्वाला आहे. अनेक सर्वोत्तम कलाकार आपल्याला नाटकांच्या माध्यमातूनच मिळाले आहेत. मात्र तरीही अनेकदा मराठी नाटकं चालत नाही, प्रेक्षक नाटकांना पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही असे एक ना अनेक आरोप होतात. याच आरोपांना आता खुद्द नाट्यकार, अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या एका पोस्टमधून उत्तर दिले आहे.
नाटकांचे महामहिम असणारे प्रशांत दामले सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते सतत त्यांच्या नाटकांबद्दल माहिती, काही किस्से, अनुभव शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, जी कमालीची चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी कमालीचा सुंदर प्रतिसाद दिला आहे. सध्या ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगमंचावर धुमाकूळ घालत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभर अनेक प्रयोग होताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘नियम व अटी लागू’ या नाटकाचा नुकताच एक प्रयोग इचलकरंजीत पार पडला. यावेळचा तिकीट खिडकीच्या बाहेरील एक फोटो दामले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग – महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…”. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे, लेखकाचे, दिग्दर्शकाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे.
दरम्यान गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केले आहे. तर याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णींनी केले आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…