Thursday, February 22, 2024

प्रतीक बब्बरने केले असे फोटोशूट की, नेटकऱ्यांनी केली थेट उर्फी जावेदशी तुलना

बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर(Prateik Babbar) त्याच्य स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. प्रतिक अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. प्रतिक बब्बरच्या लेटेस्ट फोटोशूटमळे चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये प्रतीक बब्बर विचित्र कपडे घातलेला दिसत आहे. त्याच्या या फोटोवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

मात्र, इन्स्टा यूजर्स त्याच्या स्टाइलची उडवत खिल्ली 
प्रतीक बब्बरने हे फोटोशूट GQ मॅगझिनसाठी केले आहे. त्याचे हे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो राखाडी रंगाचा कोट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. त्याचा कोट कंबरेच्या अगदी वर कापला गेला आहे आणि समोरची लांबी सामान्य कोट सारखी ठेवली आहे. यासोबतच अभिनेत्याने हातावर काळ्या रंगाचा नेलपेंट लावला आहे आणि केसही वेगळ्या स्टाईलमध्ये सेट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

 

प्रतीक बब्बरच्या नव्या लूकने एकीकडे फॅशनिस्टा लोकांची भुरळ पाडली आहे. दुसरीकडे, अनेकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे. प्रतीकच्या स्टाइलची खिल्ली उडवत झुबेर खान नावाच्या युजरने ‘उर्फी जावेद का भाई लगा रहा है रे तू’ अशी कमेंट केली. याशिवाय आणखी एका युजरने ‘भाऊ, तुझा कोट खालून फाटला आहे’ अशी कमेंट केली. एकाने लिहिले, “डिझायनरने ब्लेझरचे कपडे वाचवले आणि घरासाठी पडदे घेतले का?”

प्रतीक बब्बर क्वचितच हेडलाइन्समध्ये दिसतो पण यावेळी त्याच्या लूकने सर्वांची लाइमलाइट लुटली आहे. प्रतिक बब्बर फोटोजने नुकतेच इंटरनेटवर त्याच्या नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तो स्टायलिश सूटमध्ये दिसत आहे पण त्याची फॅशन नेटिझन्सना फारशी आवडली नाही. त्याची तुलना अतरंगी कपडे घालणाऱ्या उर्फीसोबत केली जात आहे.

दरम्यान, दिवंगत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता पाटील या आपल्यात नक्कीच नाहीत. मात्र नमक हलाल, अर्थ, भूमिका, भीगी पालकें या चित्रपटांसाठी स्मिता आजही स्मरणात आहे. स्मिता यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2 डिसेंबरला झी5 वर प्रदर्शित होणार आहे.(prateik babbar new look in stylish suit actor trolled netizens says looking like urfi javed brother)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज गायकाने काढली पाकिस्तानच्या पराभवाची खपली, पाहा व्हायरल व्हिडिओ

भांडं फुटलं रे! वरुण धवन बनणार वडील? सलमान खानने अभिनेत्याशी संबंधित दिली एक हिंट

हे देखील वाचा