छोट्या पडद्यावरील काही कलाकार हे बॉलिवूड स्टार्सप्रमाणे सिनेमात झळकत नसले, तरीही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. यामध्ये प्रतीक सहजपाल याच्या नावाचाही समावेश होतो. तो सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या टीव्ही कलाकारांपैकी एक आहे. त्याने नेहमीच त्याच्या मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस ओटीटी‘पासून ते ‘बिग बॉस १५’चा पहिला स्पर्धक बनण्यापर्यंत त्याचा सोशल मीडियावर भरमसाठ चाहतावर्ग बनला आहे. चाहते त्याला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी पसंती देतात.
सध्या प्रतीक सहजपाल (Pratik Sehajwal) हा ‘खतरों के खिलाडी १२’ या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. या शोमध्ये तो सर्व स्टंट चांगल्याप्रकारे पूर्ण करताना दिसत आहे. तसेच, चाहत्यांना त्याचा परफॉर्मन्स भावल्याचेही दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रतीक सहजपाल याचा शोमधील प्रवास संपण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
शोमधून बाहेर झाला प्रतीक सहजपाल?
माध्यमांतील वृत्तानुसार, आगामी एपिसोडमध्ये प्रतीकला एविक्ट केले जाईल. हे खरे ठरले, तर एरिका पॅकर्ड, अनेरी वजानी आणि शिवांगी जोशी यांच्यानंतर प्रतीक चौथा स्पर्धक असेल, जो शोमधून बाहेर पडेल. मात्र, हे तर आगामी एपिसोडमधूनच समजेल की, प्रतीक शोमधून बाहेर होतो की, शोमध्ये पुढचा पल्ला गाठतो.
View this post on Instagram
‘खतरों के खिलाडी १२’मध्ये प्रतीकचे मानधन
‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस १५’ या शोमधून घराघरात पोहोचणारा प्रतीक ‘खतरों के खिलाडी १२’ या शोमध्ये भरमसाठ मानधन घेत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रतीक सहजपाल याला या शोमधील प्रत्येक आठवड्यासाठी १० लाख रुपये मिळतात. २ जुलै, २०२२ रोजी सुरू झालेल्या ‘खतरों के खिलाडी १२’मध्ये प्रतीकला २ ऑगस्ट रोजी पाच आठवडे पूर्ण होणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकींग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास
कायद्याच्या कचाट्यात अडकला अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ चित्रपट, घटना चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप
मीडियाला पाहताच एकमेकांचे पटापट मुके घेऊ लागले राखी आणि आदिल, व्हिडिओ जोरदार व्हायरल