नेहा कक्कर होणार आई? फोटो अन् ‘इंडियन आयडल’मधून गायब असल्यामुळे चर्चांना उधाण


आजच्या घडीची सर्वात आघाडीची आणि लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहाने तिच्या दमदार आणि धमाकेदार गाण्याने तिची ओळख तयार केली आहे. नेहाचे प्रत्येक गाणे हिट होणारच हे कदाचित आधीच सर्वांना माहित असते. मोठ्या संघर्षाने नेहाने तिची जागा हिंदी चित्रपटांमध्ये तयार केली आहे. सोशल मीडियावरही नेहा खूपच प्रसिद्ध आहे. शिवाय टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये परीक्षक म्हणून देखील नेहा प्रसिद्ध आहे. मात्र, मागील बऱ्याच दिवसांपासून नेहा या शो मध्ये दिसत नाहीये. ती का दिसत नाही याचे कारण कोणालाच माहित नाही. मात्र, आता तिच्या या शोमध्ये नसण्याबद्दल एक शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

नेहाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला असून, तिच्यासोबत तिचा नवरा रोहनप्रीत देखील दिसत आहे. या दोघांचा अतिशय रोमँटिक असा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोसोबतच नेटकऱ्यांमध्ये अजून एक चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे, आणि ती चर्चा आहे नेहाच्या प्रेग्नंसीची. हो, ज्यापद्धतीने नेहाने तिचे पोट झाकले आहे, सैलसर ड्रेस घातला आहे. त्यावरून ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे.

नेहाने या फोटोंसोबत सर्वाना ईद मुबारक देखील केले आहे. बॅकग्राऊंडला फुग्यांचे डेकोरेशन केलेले असून, नेहाच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसून तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत आहे.

तिला मागील काही दिवसांमध्ये बऱ्याचदा विविध ठिकाणी स्पॉट केले गेले. मात्र, ती सर्वच ठिकणी सैल कपड्यांमध्ये आणि रोहनप्रीतचा हात धरून चालतानाच दिसली. तिचे हे सर्व करणे ती प्रेग्नंट असल्याकडे खूण करत असल्याचेच दिसत आहे. या फोटोंवर कमेंट करताना तिला सर्वच फॅन्स हाच प्रश्न विचारत आहे.

लग्नानंतर काही दिवसांनी लगेचच नेहा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आणि त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, काही दिवसांनी तो नेहाच्या आगामी गाण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश अन् सोनाक्षीच्या ‘ककुडा’ चित्रपटाची शूटिंग सुरू, ‘हा’ मराठमोळा निर्माता पहिल्यांदाच करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.