रितेश अन् सोनाक्षीच्या ‘ककुडा’ चित्रपटाची शूटिंग सुरू, ‘हा’ मराठमोळा निर्माता पहिल्यांदाच करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन


बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आले आहेत. यातीलच एक प्रोजेक्ट म्हणजे ‘ककुडा’ चित्रपट. रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघे लवकरच कॉमेडी हॉरर चित्रपट ‘ककुडा’ मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. यामध्ये साकिब सलीम देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचा निर्माता आदित्य सरपोतदार याने दिग्दर्शन केलेला हा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. या आधी त्याने ‘क्लासमेट्स’, ‘मौली’, ‘फास्टर फेणे’ यांसारखे मराठी चित्रपट बनवले आहेत.

‘ककुडा’ नावाच्या गावातील एका वेगळ्याच अभिशापाची ही कहाणी असणार आहे. यात सोनाक्षी, रितेश आणि साकिब या तिघांचा सामना एका भुताशी होतो. ते भूत मस्तीच्या अंदाजात अंधश्रद्धा, परंपरा ते अगदी प्रेमाबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करते. या चित्रपटाचे लेखक द्विवेदी आणि चिराग गर्ग हे आहेत. (Riteish Deshmukh and Sonakshi Sinha starrer kakuda film shooting begins)

या चित्रपटबाबत आदित्य सरपोतदार याने म्हटले आहे की, “मी रॉनी स्क्रूवालासोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे. आम्ही या चित्रपटाला एक मोठ्या कमर्शियल चित्रपटापेक्षा कमी मानत नाही. कास्टिंग एकदम बरोबर आहे. ही कहाणी तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करणार आहे.”

अभिनेता रितेश देशमुखने देखील सोशल मीडियावर या चित्रपटाची शूटिंग चालू झाल्याची माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो केला आहे. या फोटोमध्ये तो, सोनाक्षी सिन्हा, आदित्य सरपोतदार आणि साकिब सलीम दिसत आहे. त्याचे चाहते त्याला या नवीन अंदाजात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तसेच तो मराठी चित्रपट ‘अदृश्य’‌मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली घराघरात ओळख

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.