रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’


बॉलिवूडचे ‘महानायक’ म्हणजेच अमिताभ बच्चन हे त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत, जे त्यांचे काम खूप गंभीरतेने पूर्ण करत असतात. वयाच्या 78 व्या वर्षी देखील अभिनय क्षेत्रात ते मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. या सोबतच ते सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. अनेकवेळा त्यांच्या दिवसाची सुरुवात सोशल मीडिया पोस्टपासूनच होत असते. ते त्यांच्या कामापासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते लवकरच ‘केबिसी 13’ मधून टीव्हीवर झळकणार आहेत. अशातच त्यांनी केबीसीच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे.

बिग बींनी शेअर केलेला हा फोटो पाहून तुम्हाला समजेल की, ते जेव्हा काम करत असतात, तेव्हा त्यांना वेळेचे भान राहत नाही. त्यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्यांना रात्री शूटिंग करावी लागते, तेव्हा त्यांचे काय हाल होतात. (Amitabh Bachchan share glimpse of KBC 13 set on social media)

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर त्यांचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते अगदी फॉर्मल लूकमध्ये दिसत आहेत. या फोटोमधील खास गोष्ट म्हणजे ते जांभई देताना दिसत आहेत. या फोटोकडे पाहून हे समजतं आहे की, हा फोटो केबीसी शूटिंग दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये ते खूप थकलेले दिसत आहेत.

हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “असंच होत असतं, जेव्हा तुम्ही वेळेच्या विरुद्ध काम करता.” त्यांचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. तसेच अनेकजण त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती 13’ चा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, गावातील मुलांच्या शाळेसाठी 25 लाख रुपये पाहिजे असतात. गावतील लोक सगळे प्रयत्न करतात. पण काहीच उपयोग होत नाही. मग त्यांच्यापुढे केबीसीची जाहिरात येते. त्यांच्या मनात केबीसीमध्ये भाग घेण्याचा विचार येतो. बिग बी यांनी हा प्रोमो शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

-भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.