Friday, July 5, 2024

प्रीतिने आयुष्यात तब्बल दोनदा मृत्यूला अगदी जवळून हुलकावणी दिलीये; वाचा ते दोन भयंकर प्रसंग

बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीति झिंटा हिचा 31 जानेवारी रोजी 47 वा वाढदिवस होता. प्रीति ही बॉलिवूडमधील प्रतिभाशाली अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

मुळची शिमलाची रहिवासी असलेली प्रीति ही सहसा कधी कोणत्या वादात अडकलेली दिसत नाही. परंतु, तिचा अपघातांशी बराचसा संबंध आलेला आहे. प्रीति झिंटाच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्याचा तिच्या मनावर खुप परिणाम झाला. लहानपणी तिच्या वडिलांचा झालेला अपघात ती कशीबशी विसरली. परंतू, तीचा स्वत:चा देखील अनेकदा अपघात झाला आहे.

प्रीति झिंटाने स्वत: हून तिच्यासोबत घडलेल्या अपघातांबद्दल सांगितले. सन 2004 मध्ये त्सुनामीमध्ये अडकल्याचे प्रीतिने एकदा सांगितले होते. त्याच त्सुनामीत तीने तिचे अगदी जवळचे काही मित्रही गमावले. ज्यामुळे प्रीति खूप दुखावली होती.

https://www.instagram.com/p/B2lR7MQFzSG/

प्रीतिने तिच्या डोळ्यांनी त्सुनामीचा कहर पाहिला आहे. या घटनेविषयी बोलताना ती म्हणाली की, ‘त्या त्सुनामीमुळे मी मृत्यूला खूप जवळून पाहिले आहे.’

प्रीति पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मी फुकेटमध्ये होते. माझे बहुतेक मित्र त्या त्सुनामीत वाहून गेले. मी एकटीच वाचले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तो खूप कठीण काळ होता माझ्यासाठी’

जिवलग मित्र गमावण्याच्या प्रीतिवर खोलवर परिणाम झाला. ती म्हणाली की, ‘मी परत येताना हाच विचार करत होते की मी का वाचली असेल. म्हणूनच मला वाटले की माझ्या आयुष्यासोबत मी तेच केले पाहिजे जे मला आवडते.

त्या घटनेनंतर प्रीति इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील झाली. तसेच, या घटनेच्या अगोदरही प्रीतिने आपल्या डोळ्यांनी एक अपघात घडताना पाहिले. या अपघातातही प्रीति थोडक्यात वाचली. ही घटना 2004 मध्ये घडली होती.

वास्तविक श्रीलंकेच्या कोलंबो येथे टेम्प्टेशन कॉन्सर्टमध्ये प्रीति झिंटा बॉलिवूडच्या इतर सेलेब्ससोबत होती. तेथे अचानक झालेल्या स्फोटात अनेक लोक ठार झाले. या घटनेत प्रीति आणि इतर सेलिब्रिटींनी मृत्यूला अगदी जवळून पाहिले.

प्रीति झिंटाने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. शाहरुख खानसोबत ‘दिल से’ हा पहिला चित्रपट तिने केला. या चित्रपटापासून प्रीतीने बॉलिवूडला सातत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रीतिच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’, ‘संघर्ष’ या चित्रपटांचा समावेश आहे.(preity zinta has escaped death almost twice in her life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुष्मिता सेनचा डॅशिंग लूक! एका हातामध्ये सिगारेट आणि दुसऱ्यामध्ये बंदुक,पाहिलात का आर्या 3 चा ट्रेलर?

हे देखील वाचा