प्रीति झिंटाने केला थेट रस्त्यावर लँड झालेल्या विमानाचा व्हिडिओ; म्हणाली, ‘कधीच विचार केला नव्हता…’


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रीति झिंटा. ती आजकाल जास्त चित्रपटात दिसत नाही, पण सोशल मीडियावर मात्र ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये तिने रस्त्यावर घडलेली एक घटना कैद केली आहे. ही घटना तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रीति झिंटाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक विमान आकाशातून सरळ प्रीति झिंटाच्या गाडीसमोर येऊन थांबते. त्यावेळी तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट कधी ना कधी पहिल्या वेळेस घडत असते. मी कधीच विचार केला नव्हता की, रस्त्यावरून जाताना मी अचानक आकाशातून विमान उतरताना पाहिलं. पण देवाची कृपा आहे की, सर्वजण सुरक्षित आहेत.”

तिने शेअर केलेला हिडिओ कुठला आणि केव्हाचा आहे, हे तिने सांगितले नाही. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक विमान पडलेले दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाच कोणतीच हानी झाल्याची बातमी आली नाही. या विमानाच्या आजूबाजूला अनेक लोक जमलेले दिसत आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. या व्हिडिओला‌ आत्तापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रीति झिंटा ही आता चित्रपटात दिसत नाही. ती शेवटची 2018 मध्ये ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने जवळपास 8 वर्षानंतर काम केले होते. परंतु हा चित्रपट जास्त चालला नाही. परंतु तिच्या चाहत्यांसाठी ती आजही आवडती आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.