Saturday, June 15, 2024

पंतप्रधानांनी घेतली अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट, फोटो शेअर करत अभिनेत्रीचे केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (४ मार्च) पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री वैजयंतीमाला (Vaijayantimala)यांची भेट घेतली. अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीची माहिती खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये वैजयंतीमाला यांच्या कामगिरीचेही कौतुक केले.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान वैजयंतीमाला यांच्याशी बोलताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर करत पीएम मोदींनी लिहिले, “चेन्नईमध्ये वैजयंतीमाला यांना भेटून आनंद झाला. अलीकडेच त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कौतुक होत आहे. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान मोदींचा दक्षिणेकडील राज्याचा हा चौथा दौरा आहे.

या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर लोक पीएम मोदींचे खूप कौतुक करत आहेत. वैजयंतीमालाबद्दल बोलायचे तर नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती राम मंदिरात सुरू असलेल्या ‘रागसेवा’ कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसली होती. वयाच्या 90 व्या वर्षी तिने आपल्या डान्सने लोकांची मने जिंकली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची शूटिंग होणार या ठिकाणी, आखली नवी योजना
फ्लॉप चित्रपटांच्या पंक्तीत ‘भक्षक’ भूमीसाठी ठरला संजीवनी; म्हणाली, ‘हे पात्र खूप आव्हानात्मक होते’

हे देखील वाचा