Friday, February 21, 2025
Home अन्य युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

‘एमटीव्ही रोडीज’पासून ते ‘बिग बॉस’पर्यंतच्या प्रत्येक रियॅलिटी शोचा विजेता ठरलेला प्रिन्स नरुला आज एक प्रसिद्ध नाव बनला आहे. प्रिन्स तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मिस्टर पंजाबचा किताब जिंकल्यानंतर, त्याने एमटीव्ही रियालिटी शो ‘रोडीज एक्स २’ जिंकला. रोडीजनंतर, प्रिन्स ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये देखील दिसला, ज्यामध्ये तो पुन्हा जिंकला. त्यानंतर त्याने टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस ९’ चे विजेतेपदही पटकावले. एका वर्षात तीन रियॅलिटी शो जिंकून प्रिन्स नरुला घराघरात प्रसिद्ध झाला.

अभिनेत्याचा जन्म २४ नोव्हेंबर १९९० रोजी चंदीगडमध्ये झाला. बुधवारी तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया की, प्रिन्स नरुलासोबत कोणत्या कोणकोणत्या अभिनेत्रींची नावे जोडली गेली होती. (prince narula birthday special from nora fatehi to yuvika chaudhary prince narula s affair list with these beauties)

चार्ली चौहान
‘रोडीज’ शो दरम्यान प्रिन्सचे नाव शोमधील स्पर्धक चार्ली चौहानसोबत जोडले गेले. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. शो संपल्यानंतरही त्यांच्या मैत्रीच्या बातम्या जोरात होत्या. पण अचानक दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

अनुकी
‘रोडीज’ जिंकल्यानंतर, प्रिन्सने रियॅलिटी शो स्प्लिटविलामध्ये भाग घेतला. या शोमध्ये त्याची अनुकीसोबत जोडी जमली होती. दोघांमध्ये गाढ प्रेम दिसू लागले होते. या शोमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांनाही खूप पसंत होती. पण शो संपताच त्यांचे प्रेमही तिथेच संपले.

युविका चौधरी
‘बिग बॉस सीझन ९’मध्ये प्रिन्स नरुलासोबतच युविका चौधरी देखील स्पर्धक म्हणून दिसली होती. प्रिन्स युविकाला पसंत करू लागला आणि त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र, युविकाने प्रिन्सला हो म्हटले नाही आणि ती शोमधून बाहेर पडली. शो संपल्यानंतर दोघेही अचानक गायब झाले. मात्र काही वर्षांनी दोघांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी एकमेकांशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

नोरा फतेही
युविका शोमधून बाहेर होताच, प्रिन्सचे हृदय नोरा फतेहीसाठी धडधडू लागले. दोघांमधील जवळीक शोमध्ये स्पष्टपणे दिसत होती. पण नोराने शो सोडताच प्रिन्सने पुन्हा कधी तिच्याकडे नाही पाहिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा