‘बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वात सगळेच स्पर्धक तगडी स्पर्धा करत आहेत. या शोमधील मुली देखील मुलांच्या बरोबरीने हा खेळ खेळत आहेत. अशातच घरातील ‘दंगल गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे मीनल शहा सुरुवातीपासूनच तिने तिचा उत्तम खेळ खेळून सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. मुलींमध्ये तिने नेहमीच तिचा उत्तम खेळ खेळला आहे. या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी देखील अनेकवेळा तिचे आणि तिच्या गेमचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राची वाघीण असणाऱ्या या मुलीने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात टॉप ५ मध्ये तिची जागा निर्माण केली आहे.
अनेकजण म्हणतात की, मीनलला त्यांनी या आधी कुठेच पाहिले नाही. परंतु मिनलने ‘रोडीज’ हा शो चांगलाच गाजवला आहे. तिथूनच ती नावारूपाला आली. तरी देखील मराठी शो करून तिने मराठी प्रेक्षकांच्या मनात देखील तिचे स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या खेळाने आणि स्वभावाने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकून घेतले आहे. तिने हा शो जिंकावा अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. तिला अनेकजण हा शो जिंकण्यासाठी प्रेरित करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. अशातच एका खास व्यक्तीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (prince nerula give best wishesh to bigg boss contestent minal shah)
Jeet ke aana @MeMeenalShah #MeenalShah #BiggBossMarathi
— Prince Narula (@princenarula88) December 17, 2021
रोडीज स्टार प्रिन्स नेरूला याने मीनलला पाठिंबा दर्शवत तिला हा शो जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याने ट्विटर पोस्टवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवर लिहिले आहे की, “जिंकूनच ये.” ही पोस्ट शेअर करून त्याने मीनलला टॅग केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. मीनल रोडीज हा शो जिंकू शकली नाही. परंतु आता तिने बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व जिंकून तिच्या चाहत्यांना तो आनंद द्यावा अशी अनेकांची इच्छा आहे,
बिग बॉस मराठीचे हे पर्व संपण्यास आता केवळ आठवडा राहिला आहे. त्यामुळे आता कोण जिंकेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
सैफ अली खान आणि करीना यांचा लाडका मुलगा तैमूर झाला पाच वर्षांचा, त्याला सांभाळताना बेबोला येतो घाम
तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श