Thursday, April 17, 2025
Home मराठी प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

आजकाल चित्रपटापेक्षा वेबसीरिजची ट्रेंड चांगली गाजली आहे. लॉकडाऊनच्या काळात तर वेबसीरिजला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दर्शवला आहे. यातच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘आणि काय हवं’ या वेब सीरिजचा तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना या गोष्टीची माहिती दिली आहे. 

प्रिया बापटने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजमधील एक सीन शेअर केला आहे. तसेच या वेबसीरिजचा‌ ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे, हे देखील सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये उमेश आणि प्रियाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “जुई आणि संकेत परत येत आहेत तुम्हाला एंटर्टेन करायला!! आणि काय हवं??” #aanikayhava ३!! २७ जुलैला ट्रेलर रिलिझ होत आहे. तसेच ट्रेलर एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

‘आणि काय हवं’ या वेब सीरिजचे आधी दोन पार्ट प्रदर्शित झाले आहेत. त्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दर्शवला होता. आता तिसरा पार्ट बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. जुई आणि संकेतमधल्या गमती-जमती, त्यांच्यातील प्रेम, रुसवे फुगवे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण नार्वेकर हे या वेबसीरिजचे दिग्दर्शक आहेत. (Priya bapat and umesh kamat Aani kay hava 3 web series trailer will release on 28 July 2021)

सोशल मीडियावर त्यांचे चाहते या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रया देत आहेत. त्यांचे चाहते या वेबसीरिजसाठी खूप उत्साही आहे. तसेच सगळे प्रिया आणि उमेशचे अभिनंदन करत आहेत. या आधी प्रिया आणि उमेशने ‘टाईमप्लीज’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केआरकेवर एका फिटनेस मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप; मुंबईमध्ये झाली तक्रार दाखल

-‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा

-‘त्यांना मला नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये बघायला आवडते’, करीनाने सांगितले सासू शर्मिला टागोरसोबतच्या बॉन्डबद्दल

हे देखील वाचा