Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

डीपनेक गाऊन अन् पायात हाय हिल्स, बोल्ड अँड ब्युटीफुल प्रिया बापटचा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जलवा

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या टॉपला असणारी अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat). प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. प्रियाने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

प्रियाने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने गुलाबी रंगाचा लाँग साईडकट ड्रेस घातला आहे. या ड्रेससोबत तिने पायात हाय हिल्स घातले आहेत. या डीपनेक गाऊनमध्ये प्रिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिने या ड्रेसमधील तीन वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत. (Priya bapat share glamorous photos on Instagram)

यातील एक फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या या पोझला तुम्ही किती लाईक द्याल.” तिच्या या फोटोवर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने “ब्युटीफुल” अशी कमेंट केली आहे. यासोबतच ऋता दुर्गुळे आणि सौरभ कापडे यांनी देखील कमेंट केल्या आहेत. तसेच तिचे बाकी अनेक चाहते देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी तिच्या सिटी ऑफ ड्रीम या वेब सीरिज च दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले आहे.

हे देखील वाचा