Monday, July 8, 2024

‘उडे जब जब जुल्फे तेरी…!’, प्रिया बापटच्या स्टायलिश अदावर चाहते फिदा

अभिनेत्री प्रिया बापट ही एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तिने सिनेसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. आजपर्यंत तिने तिच्या अभिनयाचा आलेख कायम उंचच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते.

नुकताच प्रियाने एक फोटो शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. यात तिने मल्टीकलरचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. यात ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. यात तिने हलके कर्ल्स केले आहेत, तर हवेने तिचे केस उडतानाही तुम्ही पाहू शकता. यातील प्रियाची स्टाईल आणि अदा अगदी पाहण्यासारखी आहे.

हा फोटो शेअर करून प्रियाने कॅप्शनमध्ये, “उड़े जब जब जुल्फें तेरी, हो उड़े जब जब जुल्फें तेरी, कावरियों का दिल मचले, कावरियों का दिल मचले जींद मेरिये” असं लिहिलं आहे. फोटोला आतापर्यंत ५३ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, चाहत्यांना हा फोटो किती आवडला असेल.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा