Tuesday, July 9, 2024

‘एक कॅप्शन सुचवा बरं!’, असे म्हणताच प्रिया बापटच्या फोटोवर चाहत्यांनी पाडला कॅप्शनचा पाऊस

अभिनेत्री प्रिया बापटने सिनेसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. आजपर्यंत तिने तिच्या अभिनयाचा आलेख कायम उंचच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते.

प्रियाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत असतात. नुकताच प्रियाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे. प्रिया या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यातील तिची अदा पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. यात तिचे सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे. यात तिने फुलांचा क्रॉप टॉप व निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली दिसत आहे.

हा ग्लॅमरस फोटो शेअर करत, प्रियाने अतिशय हटके असं कॅप्शन लिहिलंय. विशेष म्हणजे कॅप्शनमध्ये तिने चाहत्यांनाच कॅप्शन सुचवा असं म्हटलंय. कॅप्शनमध्ये प्रियाने लिहिलंय की, “एकच शब्द वापरून कॅप्शन सुचवा बरं!’ हे पाहताच चाहत्यांनी वेगवेगळे कॅप्शन सुचवायला सुरूवात केली आहे. काहींनी कौतुकास्पद तर काहींनी मजेदार असे कॅप्शन या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलेले पाहायला मिळत आहेत. (priya bapat shared photo and asked fans caption for her pic)

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा