Priya Bapat | सध्या मराठी चित्रपटसृष्टीतून आणि बॉलीवूडमधून देखील अनेक नवनवीन आणि आनंदाच्या बातम्या समोर येत आहे. अनेकांनी त्यांची लग्नगाठ बांधली आहे, तर अनेकजन त्यांच्या घरात एक चिमुकल्या पावलांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. नुकतेच बॉलिवूडमधून अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. त्यामुळे सगळेच खुश आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीमधून देखील असेच एक गुड न्यूज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच प्रियाने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .ज्या फोटोंमुळे एका वेगळ्या चर्चांना उधान आलेले आहे.
प्रियाने ब्लॅक अँड व्हाईट पोल्को ड्रेसमधील काही फोटो शेअर केलेले आहेत. तिचे हे फोटो बघून सगळेजण तिला ती प्रेग्नेंट आहेत का असा प्रश्न विचारत आहेत. तीने वेगवेगळ्या पोझ मधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत.
याआधी बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांची प्रेग्नेंसी अनाउन्स करताना अशा प्रकारचा ड्रेस घातलेला होता. त्यामुळे या ड्रेसला आता प्रेग्नेंसी ड्रेस असे नाव पडलेले आहे. म्हणून अनेकजण तिला ती प्रेग्नेंट आहेत का असा प्रश्न विचारत आहे.
प्रिया बापटने (Priya Bapat ) अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचा पती आणि अभिनेता उमेश कामसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु आता तिच्या या फोटोही एक वेगळेच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांचे पुढे ती नक्की काय बातमी देणार आहे याकडे लक्ष लागलेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘स्पायडर मॅन’च्या ऑडिशनला गेला अन् त्यांनाच ऑफर देवून आला, टायगर श्रॉफचा किस्सा ऐकून व्हाल चकित
टायगर श्रॉफला विचारला गेला व्हर्जिनिटीबाबत प्रश्न; अभिनेता म्हणाला, ‘मी देखील सलमान भाईप्रमाणे…’