Friday, March 14, 2025
Home साऊथ सिनेमा ‘हास्य का गायब झालं?’ प्रिया वारियरची ‘अशी’ झालीय अवस्था, लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

‘हास्य का गायब झालं?’ प्रिया वारियरची ‘अशी’ झालीय अवस्था, लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हे नाव देशभर परिचित आहे. एका व्हायरल व्हिडिओने या अभिनेत्रीला रातोरात स्टार केले होते. या व्हिडिओमध्ये प्रियाच्या घायाळ करणाऱ्या अदा आणि इशारे पाहून देशभरातील युवावर्ग फिदा झाला होता. या व्हिडिओला रातोरात लाखो लाइक्स मिळाले होते, ज्यामुळे प्रिया वारियरला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर प्रियाच्या नावाची नेहमीच चर्चा रंगलेली असते. आता प्रियाने नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची अवस्था पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री प्रिया वारियर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. यावरून ती आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते. प्रियाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे, ज्यामुळे तिचा प्रत्येक फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होत असते. कधी बोल्ड फोटो शेअर करुन तर कधी पारंपारिक पेहरावातील फोटोंनी ती चाहत्यांना मोहित करत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर गाणीही गाताना दिसून येते. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तिचा लूक पाहून चाहत्यांना बूचकळ्यात पाडले आहे.

अभिनेत्री प्रिया वारियरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची हताश आणि निराश छबी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे फोटो शेअर करत प्रियाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिच्या चाहत्यांना तिच्याचेहऱ्यावरील हास्य का गायब झाले आहे, हाच प्रश्न पडला आहे. यामुळेच चाहत्यांनी तिला काय झाले, एवढी का निराश आहेस? असे प्रश्न विचारले आहेत.

याआधी प्रत्येक फोटोत बिनधास्त आणि हसत दिसणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी तिच्या चाहत्यांची काळजी वाढली आहे. मात्र तिने हे फोटोशूट एका ब्रॅन्डच्या प्रमोशनसाठी केले आहे. दरम्यान अभिनेत्री प्रिया वारियर लवकरच श्रीदेवी बंगलो या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत तर विष्णु प्रिया मधून कन्नड चित्रपट जगतात पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा